⚡देवगड ता.२०-:
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष २०२५ चे आयोजन केले जाते. या निमित्ताने आयोजित जल्लोष समिती २०२५ या कार्यालयाचे उदघाटन कुलकर्णी सुपर शॉपीचे मालक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.
यावेळी जल्लोष समितीचे अध्यक्ष
हनीफ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, सहसचिव संदेश शिरसाठ,खजिनदार मधुकर नलावडे,दयाळ गावकर, शामराव पाटील ,मिलिंद मोरये,मिलिंद मोहिते,दयानंद पाटील,लहरिकांत पटेल,
शैलेश कदम,एकनाथ तेली,मिलिंद खडपकर,अनिकेत बांदिवडेकर,आदी उपस्थित होते.
देवगड येथील अनुसया पारकर कॉम्प्लेक्स येथे या नवीन जल्लोष कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी उपस्थितांचे जल्लोष समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.दरम्यान जल्लोष समितीचे माजी सचिव स्वर्गीय संजय धुरी यांच्या स्मरणार्थ देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे यावेळी जल्लोष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.३० व ३१ डिसेंबरला आकर्षक नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिक धुरी यांनी केले.
देवगडात जल्लोष कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन…
