चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर पलटी…

सकाळी दहाची घटना:सुदैवाने चालक बचावला..

⚡मालवण ता.२०-: मालवण कोळंब येथील पुलानजीक वाळूने भरलेला डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर मुख्य रस्त्यावरून खाडी पात्राच्या दिशेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरून उलट्या दिशेने खाली जाऊन पलटी झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने चालक सुजितकुमार हा बचावला आहे.

या अपघातानंतर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी हजर होत पाहणी केली. याबाबतचा पंचनामा करण्यात येत असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

You cannot copy content of this page