युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या उपक्रमाचा केला संकल्प..
⚡देवगड ता.१९-: थेंबथेंब रक्ताचा ध्यास, सिंधू रक्तक्रांतीचा प्रवास” या उद्दिष्टाने प्रेरित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबांव, बागमळा आणि नारिंग्रे या गावांतील “युवा रक्तदाता ग्रुप” आणि “कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे” यांच्या पुढाकाराने “मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५ – २०३०” या महान उपक्रमाची सुरुवात होत आहे. या मिशनअंतर्गत २०२५ ते २०३० या सहा वर्षांच्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील आणि १०,००० रक्ताच्या बाटल्या संकलित करण्याचे ध्येय गाठले जाणार आहे.
चला, रक्तदान करूया आणि जीवनदान घडवूया!मानवतेच्या सेवेसाठी आपला सहभाग अमूल्य आहे.आपण सर्वांनी या मिशनमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबांव, बागमळा आणि नारिंग्रे या गावांतील "युवा रक्तदाता ग्रुप" आणि "कुलसुम ॲग्रोटेक, नारिंग्रे"यांच्या वतीने करण्यात आले आहे.
