श्वेता कोरगावकर यांनी मंत्री राणें व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा…!

⚡बांदा ता.१९-: भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची नागपूर येथे भेट घेत शुभेच्छा दिल्यात. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच महिलांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला देखील महायुतीच्या तीनही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे यावेळी सौ. कोरगावकर यांनी सांगितले. त्यामुळेच महायुतीला जिल्ह्यात १०० टक्के यश मिळाले.
यावेळी मंत्री राणे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून भविष्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.


प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची देखील सौ. कोरगावकर यांनी नागपूर विधानभवनात भेट घेत शुभेच्छा दिल्यात. यावेळी कोकणात भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page