Headlines

Global Maharashtra Breaking News

खांबाळेत दोन ठिकाणी गतिरोधक; अपघातांना आळा घालण्यास मदत*

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांच्या मागणीची पूर्तता.. ⚡वैभववाडी ता.०४-: फोंडा–वैभववाडी राज्य मार्गावरील खांबाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि आदिष्टी देवी मंदिरासमोर आज गतिरोधक बसविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच जि.प. केंद्रशाळा खांबाळे क्र. १ असून, आदिष्टी देवी मंदिरासमोर व बाजूला एसटी बस थांबा असल्याने या दोन्ही ठिकाणी नागरिकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.या पार्श्वभूमीवर…

Read Full News

ट्रॅक्टरचा टायर फुटून भीषण अपघात; करुळच्या रुपेश पाटील यांचा मृत्यू…

⚡वैभववाडी ता.०४-: ट्रॅक्टरचा पुढचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात करुळ-भोयडेवाडी येथील रुपेश हनुमंत पाटील (वय 40) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एडगाव-आंबेडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. रुपेश पाटील हे आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच 07- एएस -7812) घेऊन वैभववाडीहून करुळच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरून जात…

Read Full News

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार..

ग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा :वनविभागाचेही सहकार्य ; पाणी पातळी वाढण्यासाठी होणार मदत.. ⚡सावंतवाडी ता.०४-:एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला. रेडकरवाडीतील ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या अधिकारी व…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सवात देवगडच्या ‘श्वास’ नाटिकेला प्रथम क्रमांक

वेंगुर्लाजिल्हा विज्ञान मंडळ, सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विज्ञान, समाज आणि दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर प्रभावी भाष्य करणाऱ्या नाटिकांच्या सादरीकरणामुळे हा नाट्योत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि कलागुणांचा सुंदर आविष्कार…

Read Full News

ज्येष्ठ नागरिक दिनी समाजसेवकांचा सन्मान; नागवेकर, काळसेकर यांना ‘समाजभूषण’…

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाजात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजभूषण पुरस्कारांने प्रा. डॉ. दिनेश नागवेकर व पोलीस अधिकारी प्रमोद काळसेकर यांचा सन्मान करण्यात आला. तर श्रावणबाळ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रामदास नाईक, रसिका आईर यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन…

पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती ⚡देवगड ता.०४-: देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन साकारण्यात येणार आहे. सुमारे १०० लाख रुपयांच्या निधीतून हे गार्डन विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read Full News

वेंगुर्ला भटवाडी येथे भाजपातर्फे भूजलस्तर वाढविण्यासाठी उपक्रम

वेंगुर्लापालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार दुष्काळ सदृश्य परिस्थितीत भूजलस्तर वाढविण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शहर भागातील भटवाडी येथे युवा मोर्चा तर्फे उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रितम सावंत, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, युवा मोर्चा पदाधिकारी संजय सावंत, महेश…

Read Full News

निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला

खासदार नारायण राणेंची दिवंगत एस. टी. सावंत यांना श्रद्धांजली कणकवली;एस. टी. सावंत यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पदाधिकारी आज आपल्यातून निघून गेला, ही मोठी हानी आहे. पक्ष संघटनेत काम करताना एस. टी. सावंत यांनी नेहमी प्रामाणिकपणा आणि निष्ठेला महत्त्व दिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती एस. टी. सावंत यांचे निधन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत (काका) यांचे आज, रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. एस. टी. सावंत यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले होते….

Read Full News

न्हावेलीत दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार;

भटाचेटेंब व चौकेकरवाडी बंधाऱ्यांवर फळ्या टाकून अडवले पाणी ​सावंतवाडीवाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावामध्ये दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करणे, पाण्याची साठवण करणे आणि भूजल पातळीत वाढ करणे या उद्देशाने ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जलसंधारणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गावातील ‘भटाचेटेंब बंधारा’ तसेच ‘चौकेकरवाडी आवळेभोम बंधारा’ या दोन्ही बंधाऱ्यांवर फळ्या…

Read Full News

You cannot copy content of this page