राजेश सामंत :माड्याचीवाडी विद्यालयाची नूतन शिक्षक-पालक कार्यकारीणी जाहीर..
कुडाळ : माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे आहे असे प्रतिपादन एस.के.पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाटचे संचालक राजेश सामंत यांनी केले. एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडीची पालक शिक्षक सभा नुकतीच विद्यलयात पार पडली. यावेळी राजेश सामंत बोलत होते. यावेळी माड्याचीवाडी विद्यालयाची नूतन शिक्षक-पालक कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संस्थासंचालक महेश ठाकूर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत सामंत, शिक्षक शामसुंदर राणे, राजेंद्र घाडीगावकर उपस्थित होते. तसेच माड्याचीवाडी विद्यालयातील विद्यार्थांचे जवळजवळ ७० पालक उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यालयातील शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता जाधव व साजिदा नदाफ यांचा राजेश सामंत व महेश ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर सहाय्यक शिक्षक राजेंद्र घाडीगावकर यांनी पालक शिक्षक संघाची रचना कशी असावी याबद्दल माहिती दिली व पालक शिक्षक संघ स्थापन करण्यात आला.
अनंत मधुसूदन सामंत अध्यक्ष, राजेंद्र विष्णू घाडीगावकर सचिव, सदस्य – शामसुंदर राणे, सौ.प्रगती निवतकर, प्रवीण गणपत गावडे, सौ.दीप्ती परब व संदीप जाधव असा पालक शिक्षक संघ सन २०२६-२७ साठी स्थापन करण्यात आला.
संस्था संचालक महेश ठाकूर यांनी सध्या मोबाईल युगात आपल्या पाल्यांना मोबाईल पासून कसे दूर ठेवावे या विषयी मार्गदर्शन केले. शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी शाळेमध्ये सुरु असलेले उपक्रम या विषयी माहिती पालकांना दिली. तसेच पालकांना महिन्यातून एकदा विद्यालयाला भेट द्या असे आवाहन केले.
