Headlines

वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित या ३० जून २०२६ रोजी प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाळा, पालक, शिक्षकवर्ग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी शाळेच्यावतीने तसेच पालक–शिक्षक संघ आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्या हस्ते शीतल गावित यांचे औक्षण करून त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.या सन्मान सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच गुणाजी गावडे, शाळा समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती रमेश गावकर, शिक्षल अरविंद सरनोबत, शिक्षणप्रेमी नरेंद्र मिठबावकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील गावडे, ग्रामसेवक कदम, गुरुनाथ गावकर, उपसरपंच महेश गावडे, परशुराम पाटकर, भरत जाधव, गोविंद गावकर, महेश बापू गावडे, शिक्षकवर्ग,पालकवर्ग, विद्यार्थी, वेत्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शीतल गावित यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page