Headlines

वेंगुर्ला केळुस येथे आजकृषिदिन व शेतकरी मेळावा…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला पंचायत समिती वेंगुर्ला, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त बुधवार दि. १ जुलै रोजी स. का. पाटील विद्यामंदीर, केळूस येथील गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात तालुकास्तरीय कृषिदिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगांवकर, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर,
पंचायत समिती सदस्य शितल राऊत, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर, संकेत धुरी, योगिता परब तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण,
तालुका कृषि अधिकारी
मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी या
शेतकरी मेळाव्यास कृषी शास्त्रज्ञ, कृषी व पशुसंवर्धन विभागाकडील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जुन्या व पारंपारिक कृषी अवजारे, बियाणे व अन्य यांचे प्रदर्शन यावेळी ठेवण्यात येणार आहे. या कृषी दिन व शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केळुस ग्रामपंचायत सरपंच योगेश कृष्णा शेटये व उपसरपंच
संजीव प्रभू यांनी केले आहे.

You cannot copy content of this page