Headlines

Global Maharashtra Breaking News

राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती

कणकवली : राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे कोकण विभागाचे आमदार प्रमोद जठार यांची पक्षाकडून पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या निवडणुकीकरिता पक्ष निरीक्षक आहेत. आमदार प्रमोद जठार यांनी पक्षाच्या अनेक स्तरांवर प्रभावीपणे काम केले असून, महाराष्ट्र मध्ये प्रदेश सह अन्य…

Read Full News

कलमठ गावाला ४१ घरकुले मंजूर…

ग्रामपंचायत पाठपुराव्याला यश:सर्व घरे लवकर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणार, सरपंच संदिप मेस्त्री.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील कलमठ गावातील बेघर लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा एकदा नवीन आर्थिक वर्षात ४१ घरकुले मंजूर झाली आहेत. शुक्रवारी कलमठ ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंजूर घरकुल लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी बेघर आणि भूमिहीन गरजू लाभार्थींसाठी एकत्रित घरकुल…

Read Full News

ओसरगाव टोलवर सिंधुदुर्गच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन…

अवाणिज्य वाहनांना टोलमाफीचा फलक:व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत.. ⚡कणकवली ता.२१-: मुंबई – गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना दिलासा देणारी महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिंधुदुर्ग पासिंग असणाऱ्या अवाणिज्य वाहनांसाठी स्वतंत्र आरक्षित लेनचा फलक टोल नाक्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हावासीयांसाठी जाहीर केलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या चर्चेला आता…

Read Full News

निकृष्ट धान्याच्या लॅब रिपोर्टवरून पंचायत समिती सभेत खडाजंगी…

अधिकारी-कंत्राटदाराच्या संगनमताचा जितेंद्र गावकरांचा आरोप; धान्याची पुन्हा शासकीय व खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचे सभापतींचे आदेश.. ⚡​सावंतवाडी ता.२१-:शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा मुद्दा मागील बैठकीत सदस्य जितेद्र गावकर यांनी उपस्थित केल्यानंतर शुक्रवारच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या निकृष्ट धान्याचा लॅब रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्यावरून पुन्हा गाजला. गटशिक्षणाधिकार्यांनी धान्य चांगले आहे असा अहवाल असल्याचे सांगताच जितेंद्र गावकर हे…

Read Full News

ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी..

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन:विकासकामांचे ठराव न घेतल्याचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२१-: ग्रामपंचायत नेरूर तर्फ हवेली येथील ग्रामसेविका श्रीम. मयुरी मछिंद्रनाथ बांदेकर यांच्या कथित मनमानी व निष्काळजी कारभाराची चौकशी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पंचायत समितीच्या…

Read Full News

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश…

ठाकरे सेनेला धक्का:पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश.. ⚡कणकवली ता.२१-:ठाकरे शिवसेना सचिव,माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड,वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कणकवलीत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या समवेत कणकवली तालुक्यातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे….

Read Full News

आरोग्य विभागाने मतदारसंघातील सर्व रिक्त पदांचा डेटा सेंटर सादर करावा…

आमदार दीपक केसरकर:एमबीबीएस डॉक्टरांची भरती, आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचे निर्देश.. ⚡​सावंतवाडी.ता.२१-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मतदारसंघातील सर्व रिक्त पदांचा डेटा सादर करावा, यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्त पदांचा प्रश्न त्वरित मार्गी लावला जाईल, असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ…

Read Full News

वैभव नाईकांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…

आम. निलेश राणेंचा महारथ वैभव नाईक रोखू शकत नाहीत:दत्ता सामंत यांचे जोरदार प्रत्युत्तर.. ⚡मालवण ता.२१-:“गद्दारीचा कलंक लागेल म्हणून शिंदे शिवसेनेत गेलो नाही” असे सांगणारे माजी आमदार वैभव नाईक हे स्वतःच शिंदे गटात येण्यास उतावीळ होते, वैभव नाईक यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत येऊन यापूर्वीच गद्दारी केलेली आहे. त्यामुळे नाईक यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत….

Read Full News

ओझर विद्यामंदिर प्रशालेत मनसेतर्फे वह्यांचे वाटप…

गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून ३ विद्यार्थिनींच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाची जबाबदारी:प्रशालेस स्वखर्चाने वॉटर प्युरीफायर भेट.. ⚡मालवण,ता.२१-:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटपाचे विशेष अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आज तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये मनसेतर्फे वही वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उप जिल्हाध्यक्ष गणेश…

Read Full News

आचरा गाऊडवाडी शाळेतील पदवीधर शिक्षिकेची नियुक्ती तात्काळ मूळ शाळेत करा…

ग्रामस्थ व पालकांची मालवण पंचायत समितीकडे मागणी… मालवण, दि प्रतिनिधी आचरा गाऊडवाडी येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिकेची अन्य शाळेत कामगिरीवर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करावे, अशी आक्रमक मागणी आचरा येथील लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. शिक्षिका नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात…

Read Full News

You cannot copy content of this page