Headlines

ओझर विद्यामंदिर प्रशालेत मनसेतर्फे वह्यांचे वाटप…

गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून ३ विद्यार्थिनींच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाची जबाबदारी:प्रशालेस स्वखर्चाने वॉटर प्युरीफायर भेट..

⚡मालवण,ता.२१-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटपाचे विशेष अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आज तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये मनसेतर्फे वही वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षीय उपक्रमासोबतच तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी या प्रसंगी औदार्य दाखवत शाळेतील तीन गरजू विद्यार्थिनींना दप्तर, कंपास पेटी व इतर शालेय साहित्याचे वाटप केले. एवढेच नव्हे तर या तिन्ही विद्यार्थिनींच्या संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च स्वतः उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रशालेसाठी स्वखर्चाने वॉटर प्युरीफायर देखील भेट दिले.

या कार्यक्रमावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, सहाय्यक शिक्षक सावंत, पी. के. राणे, प्रवीण पारकर, अभय शेर्लेकर, शिक्षिका सोनाली कोदे-तळाशीलकर, शिक्षिका हर्षाली कांदळगावकर, शालेय कर्मचारी दादा परुळेकर, खोडके यांच्यासह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून मनसेतर्फे जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या या सामाजिक अभियानाचे सर्वच स्तरातून, तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून विशेष कौतुक आणि आभार व्यक्त केले जात आहेत.

You cannot copy content of this page