Global Maharashtra Breaking News

कबुलायतदार जमीन गावकरांच्या नावे करा…

चोकुळ वासियांची मागणी: मंत्री केसरकर गावकऱ्यांची दिशाभूल करत आहेत… सावंतवाडी ता.२६-: चौकुळ कबुलायतदार गावकर जमीनीवर 1999 मध्ये लागलेली महाराष्ट्र शासन ही नोंद सरकारने शुद्धिपत्रक काढून मागे घ्यावी व जमीन पुनश्चा कमलायतदार गावकर यांच्या नावे करावी ची मागणी पुन्हा एकदा चौकुळ कबुलायतदार गावकर यांनी आज येथे केली. तर कबुलायदर गावकर जमीन प्रश्नी मंत्री केसरकर हे गावकर्याची…

Read More

छ. शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा…

सावंतवाडी ठाकरे शिवसेनेने केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आज सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. येथील गांधी चौकात मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेबाबत ठाकरे सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत राज्य…

Read More

सावंतवाडीत आनंद दिघे यांना श्रद्धांजली…

शिंदे शिवसेनेने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत साजरी केली पुण्यतिथी..* ⚡सावंतवाडी ता.२६-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रद्धास्थान आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावंतवाडी शिंदे शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. सावंतवाडी येथील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळीजिल्हाप्रमुख – अशोक…

Read More

छत्रपती पुतळाप्रकरणी दोषींना बडतर्फ करा…

अन्यथा तीव्र आंदोलन:युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.२६-: राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल युवा सेने उपजिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी मोदींना दाखवण्यासाठी शिवछत्रपतींशी केलेली गद्दारी उघड पडली आहे. राजकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. पण अशी घटना घडण्यासाठी…

Read More

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे विटंबना शासन निर्मित…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी:माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी.. ओरोस ता २६हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितीतच आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे माजी खा विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाथी घोडा पालखी..जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर अशा उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला……’ या…

Read More

कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त…

⚡कणकवली ता.२६-: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवणीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय लक्ष करत स्वतः हातात दांडा घेऊन फोडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का…?

अर्चना घारे – परब यांचा सवाल:दोशींवर कडक कारवाई करा.. सावंतवाडी – सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल याची जनतेला खात्री असते. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर…

Read More

मळेवाड चिमुकली मृत्यू प्रकरणी जामीनावर सुटका…

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड येथील चिरेखाण येथील चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या दत्ताराम शंकर राऊळ,इराप्पा अमराप्पा गौडा,प्रकाश कृष्णपा लमाणी याची न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता केली.सदर कामी पुढील तपासा करिता दोन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी तपासणीक अंमलदार यांनी केली होती. परंतु पोलीस कस्टडीसाठी नमूद कारणे ही निरर्थक असून पोलीस कस्टडी करिता सबळ…

Read More

तरुणीचा विनयभंग प्रकरणी एकास अटक…

⚡कुडाळ ता.२६-: कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयताला पोलिसांनी अटक केलीया प्रकरणी तालुक्यातील तरुणीने कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहेत्यावरून त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.

Read More
You cannot copy content of this page