आंबोली,ता.६: येथील श्री राम नवमी निमित्त बाजारवाडी राम मंदिर येथे व राघवेश्वर येथील श्री राम मंदिर येथे राम नवमी निमित्त राम जन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राघवेश्वर येथे शनिवारी रात्रभर भजन होते. राम जन्म पाळण्यात करण्यात आला. तसेच उत्सव करण्यात आला. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सदस्य तसेच प.पू.भारतदास महाराजांचे भक्तगणं उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद करण्यात आला. दर शनिवारी या ठिकाणी सत्यनारायण महापूजा असते.या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार ही करण्यात आला.काम सुरु आहे. आंबोली बाजारवाडी येथील श्री राम मंदिराला संस्थान काळापासून वेगळं महत्व आहे.येथे जत्रोत्सव ही होतो. आज राम नवमी निमित्त जन्म उत्सव मोठ्या उत्साहात झाला.मोठ्या प्रमाणात गर्दी होती. चैत्र पाडव्यापासून हनुमान जयंती पर्यंत पालखी काढण्यात येते. आज नवमी निमित्त पालखी ग्रामदेवी माऊली च्या भेटी साठी येते.यानंतर महाप्रसाद कार्यक्रम करण्यात आला. आंबोली गावात दोन्ही राम मंदिरात उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
आंबोलीत दोन्ही राम मंदिरात राम जन्म उत्सव उत्साहात…
