⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज शनिवारी जिल्हा परिषद – पंचायत समिती साठी सकाळपासून 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 39.84 टक्के इतके मतदान झाले आहे.दुपारी 3.30 वाजेपर्यंत 53.03 टक्के इतके मतदान झाले आहे.यामध्ये 16161 पुरुष व 15010 स्त्री मतदार असे एकूण 31,171 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. तालुक्यात एकूण 58,785 मतदार आहेत. शेवटच्या टप्प्यात किती मतदान होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वेंगुर्ला तालुक्यात दुपारी 3.30 वा.पर्यंत 53 टक्के मतदान…
