गरिबांचा डॉकटर विभाच्या जाण्याने जिल्ह्याचे अपरिमित नुकसान ; दिलीप गिरप…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक, वेंगुर्ला मुख्य बाजारपेठ येथील रघुवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर यांचे आज शनिवारी मणीपाल गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याने संपूर्ण वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात शोककळा पसरली आहे. गोरगरीब जनतेचा कैवारी हरपला, अशा प्रतिक्रिया आज संपूर्ण वेंगुर्ला शहरात सर्व ग्रामीण भागात उमटली आहे. संपूर्ण वेंगुर्ला शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच ग्रामीण भागातील बहुसंख्य दुकानदार व्यापारी आपली दुकाने – आस्थापने बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली आहे.
मेडिकल क्षेत्रातील एक अनुभवी औषध विक्रेते म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत होते. विभा याच नावाने त्याला आम्ही व सर्चजण हाक मारायचे. त्याला गरिबांचा डॉकटरच असे म्हटले जायचे. त्यांनी गेल्या 3 दशक हुन अधिक कालावधीत दिलेली सेवा, अतिदुर्मिळच अशी आहे. त्याचे व्यापारीवर्ग व जिल्ह्यासाठी फार मोठे योगदान आहे. आज गरिबांचा कैवारी हरपला असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गात मोठी पोकळी निर्माण झाली असून आपल्या वेंगुर्ला शहराचे अतीव नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी दिली.आसमनतातील सर्व लोकांना आपुलकीने वागविणारा अशीच विभाची ओळख होती. योग्य सल्ला देणारा, गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करणारा विभा. आपल्या अनुभवाचा व कार्याचा लोकांच्या शारीरिक व मानसिक आजारावर विपरीत परिणाम न होण्यासाठी मार्गदर्शन करणारा व सल्ला देणारा विभा आज आपल्यातून निघून गेला आहे. सर्वांची नम्रतेने विचारपूस करणारा सोजवळ माणसाचा आज आकस्मिक मृत्यू झाला आहे. निश्चितच जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया वेंगुर्ला शहरातील ज्येष्ठ उद्योजक व शेतकरी दिलीप सामंत यांनी दिली.विभाच्या जाण्याने आज वेंगुर्लायचे अपार नुकसान झाले आहे. सर्वासामान्यात मिसळणारा, सर्वसामान्य माणसाशी वागताना माणूस जोडत जाणारा म्हणजे विभा. त्यामुळे त्याला सर्वच वयोगटाटील लोक आपुलकीने विभाच म्हणायचे. जनरल आपल्या वेंगुरल्यात सालस माणूस म्हणजे विभा. व्यापाऱ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने घेऊन, प्रशासनाशी सामंजसपणे वागून लोकमान्य नेतृत्व म्हणजे विभा होता. व्यवसाय करताना त्याने कधीच टोकाची भूमिका घेतली नाही. त्याचे नेतृत्व सालस होते. त्याच्या आकस्मिक जाण्याने आपले, शहराचे व वेंगुर्ला तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व कृषीभूषण शेतकरी एम. के. गावडे यांनी दिली.विभा म्हणजे वेंगुर्ला तालुक्याचे सौंदर्य होते. आज गरिबांचा डॉकटर शहरातून निघून गेला आहे. त्याचे तालुक्यात घरोघरी संबंध जोडले गेले होते. विभाने गेली 25 वर्षे व्यापारी संघाची निर्विवाद अशी सेवा केली व सेवा दिली. विभासारखे व्यक्तिमत्व, मोठा व्यक्ती होणे नाही. जिल्ह्यासाठी ही धक्कादायक बाब असून आज सर्वसामान्य जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया वेंगुर्ला आडेली येथील महाराष्ट्र टाईल अँड क्ले इंडस्ट्रिज चे मालक व उद्योजक दिगंबर नाईक यांनी दिली. विभा खानोलकर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. वेंगुर्लावासियांशी स्नेहाचे संबंध असणारे व्यक्तिमतव जाण्याने सर्वांनाच शॉक बसला आहे. वेंगुर्ला व्यापारी वर्गाचे संघटन करणारा एक चांगले व्यक्तिमत्व निर्वसले आहे, याचे अतीव दुःख झाले आहे. मेडिकल क्षेत्रात वैद्यकीय मदतीची जाण ठेऊन वागणारे थोर व्यक्तिमत्व. त्यामुळे तो अनेकांचा आधारवड होता. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पं. स. सभापती जयप्रकाश चमणकर यांनी बोलताना दिली.

You cannot copy content of this page