विशाल सावंत यांचा मित्रमंडळींकडून सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०८-: शुक्रवारी मध्यरात्री फॉरेस्ट ऑफिस परिसरातील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत सावंतवाडी गरड येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल सावंत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या खासगी पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने सर्वप्रथम आगीवर नियंत्रण मिळवण्याचे धाडसी काम केले. त्यांच्या या कार्याबद्दल मित्रमंडळींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

घटनास्थळी सुरुवातीला सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दुरुस्त नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा परिस्थितीत विशाल सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत आग पसरू न देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत होती.

यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेवक अजय गोंदवळे, नगरसेवीका सविता टोपले, साईराज नार्वेकर, नंदू गावकर, रेणू नेवगी, बाळा सावंत तसेच पोलीस विभाग, विविध यंत्रणा व सामाजिक कार्यकर्त्यांनीही जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषद व कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी पहाटेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्याचे काम केले. या सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि मदतकार्य करणाऱ्या नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशाल सावंत यांनी सुरुवातीपासून धाडसाने आगीला पसरू न देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांचा सत्कार करताना संदीप कुडतरकर, विजय बिरोडकर, प्रवीण सावंत, नितीन कुडतरकर, मारुती सावंत, स्वप्नील पाटील, ओमप्रकाश तिवरेकर, उमेश पाटणकर, अशफाक बेग आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page