वेंगुर्लातील व्यापारी संघांचे अध्यक्ष विभा खानोलकर यांचे निधन…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक, वेंगुर्ला मुख्य बाजारपेठ येथील रघुवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर (वय 65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज दुखःद निधन झाले. विवेक खानोलकर यांना गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे, भाऊ भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ व वेंगुर्ला व्यापारी संघ यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वेंगुर्ला शहरातील व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मेडिकल क्षेत्रातील एक अनुभवी औषध विक्रेते म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत होते. फार्मासिस्ट ओंकार खानोलकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page