वेंगुर्ला तालुक्यात दुपारी 1.30 वा. पर्यंत 40 टक्के मतदान…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज शनिवारी जिल्हा परिषद – पंचायत समिती साठी सकाळी 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 39.84 टक्के इतके मतदान झाले आहे.एकूण 12,368 पुरुष व 11,051 स्त्री मतदार असे एकूण 23,419 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांनी दिली.तालुक्यात एकूण 58,785 मतदार आहेत.

You cannot copy content of this page