जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीला शांततेत सुरुवात; सकाळी ११.३० पर्यंत २५.७२% मतदान..

ओरोस ता ७
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार आणि पंचायत समितीच्या त्र्याऐंशी जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात पाच लाख 61 हजार 105 मतदार निश्चित झालेले आहेत.
सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेतील दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मतदान वैभववाडी तालुक्यात १८.२६ टक्के मतदान झाले. तर १६.४९ टक्के मतदान देवगड तालुक्यात झाले. या टप्प्यात एकूण मतदान २५.७२ टक्केवर पोहोचले होते. एक लाख ४४ हजार ३३३ मतदारांनी मतदान केले. केवळ या दोन तासांत ८४ हजार ६०७ मतदारांनी मतदान केले. सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात १२.९४ टक्के झाले. कणकवली तालुक्यात १६.४३ टक्के, सावंतवाडी तालुक्यात १५.४५ टक्के, वेंगुर्ले तालुक्यात १४.६३ टक्के, मालवण तालुक्यात १४.३४ टक्के, कुडाळ तालुक्यात १३.६८ टक्के अशाप्रकारे अन्य तालुक्यांत मतदान झाले.

You cannot copy content of this page