⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज जिल्हा परिषद साठी सकाळी 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण 8441 पुरुष व 6225 स्त्री मतदार असे एकूण 14,466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. माधवी दाभोलकर या नववधूने बजावला मतदानाचा हक तालुक्यातील परुळे मतदान केंद्र या केंद्रावर
माधवी दाभोलकर या नववधूने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन ती लग्नमंडपात निघाली. याबाबतची माहिती वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.तालुक्यात एकूण 58,785 मतदार आहेत.
वेंगुर्ला तालुक्यात सकाळी 11.30 वा. पर्यंत 24.61 टक्के मतदान…
