समस्या सोडविण्यासाठी प्रवासी संघ कटिबद्ध…

कणकवली तालुका प्रवासी संघ सभेत अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन..

⚡कणकवली ता.०६-:
प्रवासी संघटनेच्या माध्यमातून गेली सात वर्ष प्रवासी समस्यांना न्याय देताना इतर अनेक सामाजिक उपक्रम राबिवले. त्यामुळे या प्रवासी संघटनेचे प शासनाबरोबर अनेक मान्यवरांनी या संस्थेचे कौतूक केले आहे. याही पुढे लोकांच्या सहभागातूनच प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन तालुका प्रवासी संघ कणकवलीचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले.

तालुका प्रवासी संघाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रमेश जोगळे सचिव विलास चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, पूजा सावंत, दादा कुडतरकर, सखाराम सपकाळ, भालचंद्र मराठे, श्रद्धा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कु. अक्सा मुदस्सर शिरगावकर हिचा तालुका प्रवासी संघ, ग्राहक पंचायत कणकवली व पेंशनर असोसिएशन यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

कणकवली नगरपंचायत येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रशासनाला प्रवाशांच्या समस्याला न्याय देण्यासाठी संघटनेच्या सभासद संख्येत वाढ व्हायला हवी. संघटनात्मक कामामुळे जनहिताचे प्रश्न मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे संघटनेच्या सभासद संख्या वाढवण्याच्या दृष्टिने विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीत यावेळी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना आवश्यक असलेली प्रवासी शेड, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी मिळणाऱ्या सवलती, महामार्ग खड्डेमुक्त, एसटीकडून प्रवाशांना आवश्यकत्या सेवा व रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात समन्वय साधून प वासी भाडे निश्चित करणे आदी प्रवाशांच्या अनेक समस्यांबाबत चर्चा करून संबंधितानी याची दखल घेऊन योग्य व वेळीच न्यायाची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

यावेळी केशव जाधव, सुगंधा देवरुखकर, अमित मयेकर, सुभाष राणे, प्रवीण गायकवाड, केशव पावसकर, अमोल भोगले, कृष्णा दळवी, विठ्ठल गाड, प्रकाश वाळके, श्री. सावंत, रविंद्र कडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page