कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान…

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न…

⚡ओरोस ता.०६-: आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध करून देत मतदारसंघात अत्यंत महत्वाच्या आणि अनेक वर्षाची मागणी आलेल्या कामांसाठी मंजुरी दिली आहे.

या कामांमध्ये नांदोस गिरेश्वर मंदिर ते लिंगेश्वर मंदिर रस्त्यावर LT लाईन श्री फेस करणे, नेरूर कुलस्वामिनी मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, पावशी सिमावाडी कुंभार वाडी येथे १०० kV ट्रान्सफॉर्मर बसविणे, माड्याचीवाडी (मडगाव) पोलीस चेक पोस्ट नजीक ट्रान्सफॉर्मर बसविणे, वेताळ बांबार्डे पावणाईटेंब सावंत पार्क १०० kV ट्रान्सफॉर्मर करणे, आंबेरी माणगाव मडाचा उंचावला गावातील खराब झालेल्या ११ kv लाईनची बदली व दुरुस्ती करणे, जांभवडे कुंभारवाडी व भंडारवाडी येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर व ११ KV लाईन करणे, झाराप मुंडयेवादी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, निरुखे नाईकवाडी येथे थ्रि फेस लाईन करणे. या कामांचा समावेश आहे.

पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार असून अत्यंत तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे नांदोस, नेरूर, पावशी, माड्याचीवाडी, आंबेरी, जांभवडे, वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page