सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, सावंतवाडी येथे गुरुवार १० एप्रिल रोजी सकाळी ०९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथे १० एप्रिल रोजी रक्तदान शिबीर…
