Headlines

Global Maharashtra Breaking News

सीआरझेड संदर्भातील लढ्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडून ५ लाखांचा निधी जाहीर…

रविकिरण तोरसकर: निलेश राणेंच्या पुढाकारामुळे रहिवाशांना आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.. ⚡​मालवण,ता.२३-: किनारपट्टी नियमन क्षेत्र कायद्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माणj झालेले गैरसमज दूर करणे, जनजागृती करणे आणि न्यायालयीन लढ्यासाठी मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी तब्बल ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे अशी माहिती सीआरझेड जनजागृती समन्वय समितीचे रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.हॉटेल…

Read Full News

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

विजेत्यांवर होणार बक्षीसांची खैरात मालवण : (प्रतिनिधी) मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथील कस्टम ऑफिस शेजारी, मेन गेट येथे करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचे ११ वे वर्ष असून विजेत्या महिलांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली…

Read Full News

राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर यांचा तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथे मुक्ताई ॲकेडमीच्या दहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील अव्वल मानांकित राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रमेश रामदूरकर यांचा सावंतवाडीचे तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते आणि सुप्रसिदध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक श्री.विनायक नार्वेकर, सुशांत पाटणकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण…

Read Full News

मळेवाड शिरोडा रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा झाडी त्वरित मारा..

आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. सावंतवाडीमळेवाड शिरोडा रस्त्यावर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात या मार्गावरून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा असे मागणी आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांनी केली आहे.सद्यस्थितीत…

Read Full News

शिरोडा आजगाव येथे इर्टीका व बोलेरो पिकअप मध्ये अपघात….

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या कारचे नुकसान वेंगुर्लाआजगाव मळेवाड राजगड रिसॉर्टच्या बाजूला अपघात होऊन वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.सिद्धेश उर्फ भाई परब हे आपल्या इर्टीका कारने आईसह गोवा येथे नातेवाईकांच्या महिना क्रिया कार्यासाठी जात होतें. यावेळी राठोड नामक भाजी विक्रेता सकाळी…

Read Full News

राष्ट्रीय स्पर्धेत दिव्य ज्योती स्कूलच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.२३-: एक्स्ट्रा स्कूल, बंगळुरू यांच्या वतीने इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशन, गोवा स्टेट चॅप्टर यांच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आंतरराष्ट्रीय शब्दलेखन स्पर्धा, लेखन कौशल्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील राष्ट्रीय गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी मडगांव, रवींद्र भवन, गोवा येथे उत्साहात पार पडला….

Read Full News

शिंदे शिवसेनेतर्फे आडेली हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली येथे शिवसेना नेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून प्रशालेतील 88 विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कुडाळ शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी या वह्या वाटप कार्यक्रमासाठी सहकार्य केले व यापुढेही आपण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मुलांना ‘ शिक्षणाचे महत्त्व व व्यसनमुक्त जीवन कसे जगावे’…

Read Full News

मठ येथे उद्या गावदिंडीचे आयोजन

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलमठ ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी गावदिंडीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मठ येथील प्रसिद्ध श्री देव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक हरिनाम सप्ताहाला नागपंचमीपासून (दि.17 ऑगस्ट) प्रारंभ झाला आहे. या सप्ताह कालावधीत मंदिरात रोज विविध संगीत व वारकरी भजनी…

Read Full News

इन्सुलीत आयोजितरानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेदिका परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प: विशाल परब यांचा महिला उद्योजकतेला आधुनिक बाजारपेठेची जोड देण्याचा विश्वास.. ⚡सावंतवाडी ता.२२-: कोकणच्या लाल मातीत आणि डोंगरदऱ्यांत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांना स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इन्सुली येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि कोकणातील महिलांचे पाककौशल्य यांचा…

Read Full News

आचरा येथे २५ रोजी नारळ लढविणे स्पर्धा

उबाठा शिवसेनेचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे रंगणार आहे. यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून यावर्षी महिलांसाठी देखील स्वतंत्र स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकाला ५,००१ रुपये व…

Read Full News

You cannot copy content of this page