Headlines

आचरा येथे २५ रोजी नारळ लढविणे स्पर्धा

उबाठा शिवसेनेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे रंगणार आहे. यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून यावर्षी महिलांसाठी देखील स्वतंत्र स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकाला ५,००१ रुपये व चषक, तर उपविजेत्याला ३,००१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचा चषक मंदार ओरसकर, नगरसेवक यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे.

महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा

यंदाच्या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे आचरा विभागातील महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली आहे. महिला विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेतीस पैठणी, द्वितीय क्रमांकास भेटवस्तू देण्यात येईल. पैठणीचे प्रायोजक गजानन गावकर आहेत. महिला विभागात प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. महिलांसाठी स्पर्धेतील नारळ मोफत उपलब्ध करूने देण्यात येतील.

या दोन्ही स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, नाव नोंदणीसाठी ९१६८१०७०१००८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page