मालवण : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क. स्तर), मालवण येथे दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तालुका विधी सेवा समिती, मालवण आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे.
या लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था आणि ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची संधी उपलब्ध आहे. पक्षकारांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, मालवणच्या कार्यालयाकडे दाखल करावीत. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे चर्चेद्वारे, तडजोडीने निकाली काढायची आहेत, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), मालवण तथां तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे
