वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली येथे शिवसेना नेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून प्रशालेतील 88 विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कुडाळ शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी या वह्या वाटप कार्यक्रमासाठी सहकार्य केले व यापुढेही आपण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मुलांना ‘ शिक्षणाचे महत्त्व व व्यसनमुक्त जीवन कसे जगावे’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेश सामंत, खजिनदार रवींद्र धर्णे, मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षक अर्जुन माळी, प्रियांका गावडे, बाबा धर्णे, उदय आडेलकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमात अरविंद करलकर यांचा माजी विद्यार्थी संघातर्फे शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिंदे शिवसेनेतर्फे आडेली हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
