Headlines

मठ येथे उद्या गावदिंडीचे आयोजन

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
मठ ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी गावदिंडीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मठ येथील प्रसिद्ध श्री देव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक हरिनाम सप्ताहाला नागपंचमीपासून (दि.17 ऑगस्ट) प्रारंभ झाला आहे. या सप्ताह कालावधीत मंदिरात रोज विविध संगीत व वारकरी भजनी मंडळांची भजने संपन्न होत आहेत. या सप्ताहाच्या सातव्या दिवशी रविवारी गावदिंडीचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता मठ तिठा येथून या गावदिंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये वेंगुर्ला येथील मूळपुरूष धावडेश्वर मंडळाचे भजन, वेतोरे-मिरमेवाडी येथील श्री देव समंध मित्रमंडळाचा “कृष्णजन्म” हा चित्ररथ असणार आहे. ही दिंडी ढोलताशांच्या गजरात भजन करत श्री देव स्वयंभू मंदिरात जाणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव स्वयंभू देवस्थान उपसमिती मठ व गावकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page