आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी.
सावंतवाडी
मळेवाड शिरोडा रस्त्यावर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात या मार्गावरून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा असे मागणी आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांनी केली आहे.
सद्यस्थितीत मळेवाड शिरोडा रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे यामुळे समोरून येणारी वाहने वाहन चालकांना दिसून येत नाहीत अशामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत मात्र आगामी गणेश चतुर्थी सण पाहता रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ राहणार आहे चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावात दाखल होणार आहेत त्यामुळे बांधकाम विभागाने याची दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याबरोबरच रस्त्यावरील पडलेले खड्डे तसेच अन्य डागडूचीकडेही त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी श्री कामतेकर यांनी केली आहे.
