Headlines

शिरोडा आजगाव येथे इर्टीका व बोलेरो पिकअप मध्ये अपघात….

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या कारचे नुकसान

वेंगुर्ला
आजगाव मळेवाड राजगड रिसॉर्टच्या बाजूला अपघात होऊन वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.
सिद्धेश उर्फ भाई परब हे आपल्या इर्टीका कारने आईसह गोवा येथे नातेवाईकांच्या महिना क्रिया कार्यासाठी जात होतें. यावेळी राठोड नामक भाजी विक्रेता सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शिरोडा येथे भाजी विकायला जात असताना रस्त्यावर गाडीसमोर झाडाची फांदी काठी समोर आल्यामुळे वाहन कंट्रोल न झाल्याने सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या कारला ठोकले. यात इर्टीका कारचे नुकसान झाले असून सिद्धेश परब यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला युवक काँगेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान वेंगुर्ला गोव्याकडे जाणारा हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष पुरवून रस्ता दुतर्फा लोमकळत असलेली झाडी, मोठ्या फांद्या कटिंग करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनधारकातून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page