Headlines

Global Maharashtra Breaking News

कारवरील नियंत्रण सुटल्याने वागदे डंगळवाडी येथे अपघात…

एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी.. कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर ( रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास कणकवली तालुक्यातील वागदे डंगळवाडी येथे झाला. अपघातात चालक उदय बाबाजी पवार ( रा….

Read Full News

मोरगांव श्री देव म्हाताराबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा उद्या…

⚡बांदा ता.०४-: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोरगांव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव म्हाताराबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. ५ मे रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ वा.श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभस्थळी आगमन, सकाळी ९ ते ९.३० श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर वमंदिर आसनावर अभिषेक,सकाळी १० ते १२…

Read Full News

तेंडोलीत उद्यापासून देवी अनलादेवीचा नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा…

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ ते १० मे या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.५ रोजी सकाळी ७ वाजता प्रायश्चित्त विधी, देवतावंदन, गाऱ्हाणे, संकल्प, संभारदान, पुनः संकल्पपूर्वक वेदोक्त, पुण्याह‌वाचन, स्थलशुध्दी, शांतीहोम, मंडप प्रवेश, मंडप प्रतिष्ठा, गणेश यागांग भूत सहस्रावर्तन, श्री गणपती…

Read Full News

समजला एकत्र आणण्यासाठी असे मेळावे आवश्यक…

शांतारामभाऊ कदम:परीट समाजाच्या कोकण विभागीय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ : परीट समाजाला एकत्र आणण्यासाठी असे मेळावे आवश्यक असून कुडाळ मध्ये होत असलेल्या या मेळाव्याची उपस्थिती समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांनी सांगितले. अखिल भारतीय धोबी महासंघ, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ, श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ…

Read Full News

आंबडोस ग्रामदेवतेच्या ६ रोजी वर्धापनदिन…

दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. ओरोस ता ४मालवण तालुक्यातील आंबडोस गावाची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन ६ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.आंबडोस गावाची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचे…

Read Full News

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणे ही माझी जबाबदारी…

संजू परब :सातोसेतील श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थानतर्फे श्री. परब यांचा सत्कार… बांदा : सातोसे गावातील स्ट्रीट लाईटसाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावला. गावातील क्रिकेट स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांसाठी माझी नेहमी मदत असते. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून या मंदिरासाठी ५ लाखांचा निधी देण्यात आला. तुमचं माझ्यावरील प्रेम असंच राहूदे….

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची १० रोजी वार्षिक सर्वसधारण सभा…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवार या संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसधारण सभा हायस्कूलच्या चिंतन हेमंत परब सभागृहात शनिवार १० मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, संस्थेच्या सन२०२४-२०२५ च्या वार्षिक अहवालास मंजूरी देणे, सन २०२४-२०२५ च्या…

Read Full News

चोरट्याचा चोरी करण्याचा डाव फसला…

अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरातील घटना ; चोरट्याचा शोध घेऊन केले पोलिसांच्या स्वाधीन. सावंतवाडी : पतीच्या जागरूकपणामुळे न्यू खासकीलवाडा येथील माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला असून यावेळी पती प्रसाद कोरगावकर व अवधूत नाटेकर यांनी त्या चोरट्याचा शोध घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान…

Read Full News

शिवडाव येथे कार्यशाळा उत्साहात…

कणकवली : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर चिल्ड्रेन डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बालदरबार २०२५ हे व्यक्तिमत्त्व अणि नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत भगवद्गीता आणि व्यक्तिमत्त्व विकास, अज्ञात भीतीवर मात करणे याविषयांवर डॉ. उमेशचंद्र सावंत यांनी मार्गदर्शन केले. वैशाली आणि अरविंद सावंत यांनी सामाजिक पर्यावरण, लोकशाही,…

Read Full News

करूळ येथील कर्णिक हुतात्मा स्मारकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम…

तहसीलदार दिक्षांत देशपांडेची उपस्थिती:स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन… कणकवली : तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकाच्या परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली यावेळी स्वच्छतेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार देशपांडे यांच्या प्रेरणेने आणि करूळच्या सरपंच समृद्धी नर, करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, तसेच स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page