संजू परब :सातोसेतील श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थानतर्फे श्री. परब यांचा सत्कार…
बांदा : सातोसे गावातील स्ट्रीट लाईटसाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावला. गावातील क्रिकेट स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांसाठी माझी नेहमी मदत असते. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून या मंदिरासाठी ५ लाखांचा निधी देण्यात आला. तुमचं माझ्यावरील प्रेम असंच राहूदे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.
सातोसे रेखवाडी येथील श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थानच्या वर्धापनदिन कार्यक्रमात श्री. परब बोलत होते. देवस्थानच्यावतीने जिल्हाप्रमुख श्री. परब तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख मांजरेकर आदी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे म्हणाले, दिपक केसरकर यांच्या विजयात संजू परब यांचा मोठा वाटा आहे. धडाडी आणि चिकाटी असणारा नेता म्हणजे संजू परब. पुन्हा सावंतवाडी नगरपरिषदेवर श्री. परब शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
