मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची १० रोजी वार्षिक सर्वसधारण सभा…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवार या संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसधारण सभा हायस्कूलच्या चिंतन हेमंत परब सभागृहात शनिवार १० मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, संस्थेच्या सन
२०२४-२०२५ च्या वार्षिक अहवालास मंजूरी देणे, सन २०२४-२०२५ च्या वार्षिक जमा खर्चास मंजुरी देणे (०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ अखेर), सन २०२५-२०२६ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२५-२०२६ साठी संस्थेचे कार्यक्रम व उपक्रमाबाबत चर्चा करून निर्णय घेणे, २०२३-२०२४ च्या लेखा परिक्षण अहवालास मान्यता देणे, सन २०२५-२०२६ साठी लेखा परिक्षक नेमणूक करणे, सभासदांकडून आलेल्या सुचना व ठराव यावर विचार करून निर्णय घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी सभेला आवश्यक ती गणपूर्ती न झाल्यास सदरची सभा अर्धा तास तहकूब ठेऊन तहकूब झालेली सभा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकणी सुरू करण्यात येईल. त्यास गणसंख्येचे बंधन राहणार नाही, सभेमध्ये आयत्यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याच ठिकाणी उपलब्ध माहितीनुसार देण्यात येतील. संस्थेच्या सभासदांना सभेपुढे काही सुचना/ठराव मांडावयाचे असल्यास ते त्यांनी लेखी स्वरूपात ०५/०५/२०२५ पर्यंत संस्थेचे अध्यक्ष/खजिनदार यांचे कडे द्यावेत, असे कार्यकारी मंडळाच्यावतीने सुचविण्यात आले आहे. सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page