चोरट्याचा चोरी करण्याचा डाव फसला…

अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरातील घटना ; चोरट्याचा शोध घेऊन केले पोलिसांच्या स्वाधीन.

सावंतवाडी : पतीच्या जागरूकपणामुळे न्यू खासकीलवाडा येथील माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला असून यावेळी पती प्रसाद कोरगावकर व अवधूत नाटेकर यांनी त्या चोरट्याचा शोध घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले

दरम्यान हा संशयित चोरटा येथील गार्डनमध्ये चालवणारा ठेकेदार यांचा कामगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर अन्नपूर्णा कोरगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे परप्रांतीय कामगारांचे डॉक्युमेंट्स व गार्डनमध्ये वापरण्यात येणारे सर्व खेळणी यांचे फिटनेस चेक करूनच परमवी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी क दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री या परप्रांतीय कामगाराकडुन चोरीचा प्रयत्न करण्यात आला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान शेजारी असलेल्या माजी उप नगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरी हा इसम घुसला. मेल्यात लागलेले गेम्स चालवणारा ठेकेदार फरीद खान यांचा तो मुलगा असून राजू फरीफ खान असं त्याच नाव आहे. त्याने माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून काही साहित्य आस्थाव्यस्थ केले. यावेळी उपनगराध्यक्षांचे पती प्रसाद कोरगावकर यांना चाहूल लागताच त्यांनी बाहेर येऊन पाहिले. यावेळी हा परप्रांतीय चोरी करताना दिसला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हल्या करण्याचा प्रयत्न केला व दोन मजल्यावरून उडी मारून पळ काढला. यावेळी श्री. कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, अवधूत नाटेकर, रवी जाधव यांनी त्याला शिताफिने पकडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, शहरात हंगामी व्यवसायासाठी येणाऱ्यांना परवानगी देताना त्यांचे आधार कार्ड, नागरिकत्व तपासावे. सर्व परप्रांतीय कामगारांची नोटरी करूनच त्यांना व्यवसायाचा ठेका द्यावा. उद्यानात येणाऱ्या छोट्या मुलांशी ही मंडळी गैरवर्तन करू शकतात. याचीही दक्षता प्रशासनान घेतली पाहिजे. यासाठी योग्य ती खबरदारी मुख्याधिकारी, पोलीस प्रशासनाने घेऊन चिमुकल्या मुलांसह शहरवासीयांची सुरक्षितता राखावी अशी मागणी उपनगराध्यक्षा सौ. कोरगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page