कणकवली : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर चिल्ड्रेन डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बालदरबार २०२५ हे व्यक्तिमत्त्व अणि नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेत भगवद्गीता आणि व्यक्तिमत्त्व विकास, अज्ञात भीतीवर मात करणे याविषयांवर डॉ. उमेशचंद्र सावंत यांनी मार्गदर्शन केले. वैशाली आणि अरविंद सावंत यांनी सामाजिक पर्यावरण, लोकशाही, बंधुत्व या विषयावर जागृती केली
