आंबडोस ग्रामदेवतेच्या ६ रोजी वर्धापनदिन…

दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

ओरोस ता ४
मालवण तालुक्यातील आंबडोस गावाची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन ६ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आंबडोस गावाची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचे नूतनीकरण मे २०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर ६ मे २०१८ रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिवर्षी या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी सुध्दा ६ मे रोजी वर्धापनदिन आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री देव रवळनाथ येथे लघुलुद्र होणार आहे. त्यानंतर श्री देवी विठ्ठलादेवी येथे अभिषेक होणार आहे. दुपारी १२.३० ते १ या वेळेत महाआरती, तीर्थप्रसाद आणि महानैवेद्य होणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता श्री सत्यनारायण महाआरती होणार आहे. यानंतर सुस्वर भजने होणार आहेत. रात्री ९ ते ९.३० वाजता मंदिर सभोवताली देवाची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १० वाजता म्हापण येथील ओमकार दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविक, रसिक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो:- श्री देव रवळनाथ मंदिर

You cannot copy content of this page