मोरगांव श्री देव म्हाताराबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा उद्या…

⚡बांदा ता.०४-: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोरगांव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव म्हाताराबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. ५ मे रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ८ वा.श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभस्थळी आगमन, सकाळी ९ ते ९.३० श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर व
मंदिर आसनावर अभिषेक,
सकाळी १० ते १२ श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता महाआरती,
दुपारी १ ते ४ महाप्रसाद व तीर्थप्रसाद सायं. ४ ते ६ मोरगांव सामस्थांचे भजन, ६ ते ७ पावणी कार्यक्रम, ७ ते ७.३० सांजआरती,रात्री ८ ते ९.३०स्वरधारा भजन मंडळ तांबुळी बुवा अमित तांबोळकर यांचे भजन,
रात्री १० वाजता श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, नेरुर प्रस्तुत नवीन ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग त्रिखुर ब्रम्हांड प्रलय सादर होणार आहे.
सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन देवदर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मोरगांव ग्रामस्थ व श्री देव म्हाताराबाबा देवस्थान कमिटी मोरगांव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

फोटो. – ( मोरगाव श्री देव म्हाताराबाबा देवस्थान )

You cannot copy content of this page