Headlines

Global Maharashtra Breaking News

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा…

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर:पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-:नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा (ऐच्छिक) पुनर्वसन अनुदानापोटी तब्बल ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपयांची रक्कम अदा करण्यास…

Read Full News

नारळ उत्पादकांना पाच वर्षांसाठी मोफत खत

बांदा/प्रतिनिधीनारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किमतीचे खत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा….

Read Full News

मुडेडोंगरी मैदानाच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध…

संपूर्ण ११०० गुंठ्यांची मोजणी करण्याची मागणी :नगरपंचायत प्रशासनच्या आश्वासनानंतर २४८ गुंठ्यांच्या मोजणीला संमती:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची मध्यस्थी यशस्वी कणकवली : कणकवली शहराच्या १९९९ च्या विकास आराखड्यात मुडेडोंगरी परिसरातील सुमारे ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या २६-२७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील २४८ गुंठ्याची मोजणी करताना नागरिकांनी…

Read Full News

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग…

आरोंदा ते न्हावेली रस्त्यावरील वाढलेली झाडे व गवत कापण्याचे काम सुरु ; पं.स सदस्य शरद धाऊसकर यांच्या मागणीला यश सावंतवाडीआरोंदा मुख्य रस्ता ते न्हावेली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडण्यासोबत व गवत मारण्याबाबत पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी अलीकडेच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये आवाज उठवतात जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हे काम आजपासून…

Read Full News

वेंगुर्ला बसस्थानकातून उद्यापासून वेंगुर्ला – अक्कलकोट विशेष बसफेरी

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वेंगुर्ला आगार मार्फत मंगळवारी25 ऑगस्ट रोजीसकाळी 7:45 वा.वेंगुर्ला बसस्थानकातूनवेंगुर्ला मठमार्गे – कुडाळ – कणकवली – गगनबावडा मार्गे – अक्कलकोट(श्री स्वामी समर्थ महाराज महाराज पीठ) पर्यंत विशेष बसफेरी सोडण्यात येणार आहे. यासाठी75 वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास,ज्येष्ठ नागरिक (65 ते 75 वर्ष 50 टक्के सवलत),महिलांसाठी असणारी 50 टक्के तिकीट सवलतया फेरीमध्ये लागू…

Read Full News

सावंतवाडीत रंगणार ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सव’…

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार; २५ व २६ ऑगस्टला नगरपरिषद प्रांगणात आयोजन.. ⚡सावंतवाडी, ता. २४ -: पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, तसेच त्यांच्या औषधी गुणधर्म व पौष्टिकतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव…

Read Full News

राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळचे विशेष मार्गदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळ खेळाचे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीर घेण्यात येईल. पुढील कालावधीत होणा-या विदयार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ…

Read Full News

कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा ७ सप्टेंबरला विशेष दौरा…

विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थांच्या समस्या जाणून घेणार:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२४-: मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेट) सदस्य सोमवार, ७ सप्टेंबर रोजी कुडाळच्या विशेष दौऱ्यावर येणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयांमधील अडचणी तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी सिनेट सदस्य थेट संवाद साधणार आहेत. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून…

Read Full News

वजराट ग्रा.पं. व ग्रामस्थांचे स्ट्रीटलाईटच्या माहितीसाठी लाक्षणिक उपोषण

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतच्या स्ट्रीटलाईटच्या माहितीसंदर्भात महावितरणकडून अद्याप माहिती न मिळाल्यामुळे सोमवारी (24 ऑगस्ट ) ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपोषण छेडण्यात आले.यावेळी वजराट ग्रा.पं. सरपंच अनन्या पुराणिक, आनंद पुराणिक, माजी ग्रा.पं. सदस्य प्रेमानंद सावंत -भोसले, संदिप पेडणेकर, ग्रा.पं. सदस्य रसिका मेस्री, प्रियांका केरकर, शामसुंदर पेडणेकर, चेतन नाईक, श्री गिरेश्वर सोसायटी…

Read Full News

कारिवडे येथे सचिन सावंत मित्र मंडळाची भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात…

मालवण संघ विजेता; जय मानसेश्वर संघ, वेंगुर्ला उपविजेता.. ⚡सावंतवाडी ता.२४-: कारिवडे येथील हायस्कूलच्या मैदानावर सचिन सावंत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. गोवा राज्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १६ मातब्बर संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम सामन्यात मालवण संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले,…

Read Full News

You cannot copy content of this page