Headlines

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग…

आरोंदा ते न्हावेली रस्त्यावरील वाढलेली झाडे व गवत कापण्याचे काम सुरु ; पं.स सदस्य शरद धाऊसकर यांच्या मागणीला यश

सावंतवाडी
आरोंदा मुख्य रस्ता ते न्हावेली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडण्यासोबत व गवत मारण्याबाबत पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी अलीकडेच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये आवाज उठवतात जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हे काम आजपासून हाती घेतले आहे. त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
न्हावेली गावातून आरोंद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली होती यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याच मुद्द्यावर श्री धाऊसकर यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
वाहतुकीला अडथळा ठरणारे झाडे तोडण्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी मारून आगामी गणेश चतुर्थी पूर्वी सदरचा मार्ग सुरळीत करा अशी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर यामुळे खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आज सदरचे काम त्वरित हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page