Headlines

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर…

⚡सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकुण ४ जागा आरक्षित झाल्या असून त्यातील २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही. तर इतर मागास प्रवर्गासाठी १७ जागा आरक्षित असून त्यातील ८ महिला तर ९ जागा सर्वसाधारणसाठी…

Read Full News

सुचेता कशाळीकर यांचे अल्पशा आजाराने निधन…!

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील सुचेता श्रीपाद कशाळीकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. डॉ. श्रीपाद कशाळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. आज राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील प्रसिद्ध वैद्य कै.डॉ.श्रीपाद कशाळीकर यांच्या त्या पत्नी होत्या. आज माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे….

Read Full News

*सेंट्रल इंग्लिश स्कूलचा कु . वसंत गवस शिष्यवृत्तीसाठी पात्र …

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु . वसंत संदीप गवस (२१० गुण ) शहरी विभागात७०.९४ % मिळवून जिल्ह्यात १६ व्या क्रमांकावर येत शिष्यवृतीसाठी पात्र ठरला आहे . त्याला श्रीम. स्मृती गवस, श्रीम. मारिया पिंटो ,श्रीम. फिरदोस खॉजा , श्रीम. तेहसीन मिर या…

Read Full News

आंबगाव-रूपणवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील आंबगाव-रूपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी ही घटना समजल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती, परंतु रात्रीच्या अंधारामुळे ती थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी शरद लोहकरे, श्री. धोत्रे, श्री….

Read Full News

वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा, पडलेला मोबाईल केला मालकाच्या स्वाधीन…

⚡कणकवली ता.१५-:शहरातील पटवर्धन चौक येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना मंगळवारी सकाळी तेथे पडलेला एक मोबाईल मिळाला. त्यानंतर त्यांनी त्या मोबाईल या मालकाचा शोध घेऊन मोबाईल मंगेश महादेव लाड रा. नाटळ यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी मंगेश लाड यांनी विनोद चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.मंगेश लाड हे मंगळवारी सकाळी कणकवली बाजारात आले असता…

Read Full News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१५-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत ( ६२ ) यांचे मंगळवारी सकाळी १० .३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत , नातू , भाऊ , भावजय , पुतणे असा परिवार आहे .

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये मान्सून स्पोर्ट्स उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१३-: दिनांक 11व 12जुलै रोजी मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेत दोन दिवसीय भव्यदिव्य मान्सून स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये फुटबॉल, हॉलीबॉल,बास्केटबॉल, रस्सीखेच, कबड्डी, डॉजबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 11जुलै रोजी उदघाटनाचा दिमाखदार कार्यक्रम पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नॅशनल लेव्हल कॅरमपटू केशर निर्गुण व उपरकर शूटिंग अकॅडेमीचे संचालक श्री….

Read Full News

किल्ले सिंधुदुर्गचा जागतिक वारसा स्थळात समावेश; मालवणात शिवप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा…

⚡मालवण ता.१२-:छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याने मालवण बंदर जेटी येथे शिवप्रेमीनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने आयोजित या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने ढोल ताशांचा गजर करीत, गुलाल उधळीत, फटाक्यांची…

Read Full News

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मालवण येथे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.१२-:गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिर ओझर कांदळगावचे माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांच्या समवेत ओझर विद्या मंदिर चे निवृत्त शिक्षक कै. श्री.केळकर सर यांच्या मालवण धुरीवाडा येथील निवासस्थानी गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी व संघटक उमेश कोदे यांनी केळकर सर यांच्या शैक्षणिक कार्याची महती कथन करणारा गुरुवर हृद्येश्वर तू…

Read Full News

पालक व शिक्षक हा बंध अधिक मजबूत झाला पाहिजे…

संजय खोचरे:अंबाजी विद्यालयाचा विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.. ⚡मालवण ता.१२-: शिक्षक, पालक व पाल्य या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षण अधिक सुकर होऊ शकते. त्यासाठी पालक व शिक्षक हा बंध अधिक मजबूत झाला पाहिजे, असे प्रतिपादन रेकोबा हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी केले. मालवण वायरी येथील अंबाजी विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रेकोबा हायस्कुलच्या सभागृहात संपन्न झाला….

Read Full News

You cannot copy content of this page