संजय खोचरे:अंबाजी विद्यालयाचा विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न..
⚡मालवण ता.१२-: शिक्षक, पालक व पाल्य या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षण अधिक सुकर होऊ शकते. त्यासाठी पालक व शिक्षक हा बंध अधिक मजबूत झाला पाहिजे, असे प्रतिपादन रेकोबा हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी केले.
मालवण वायरी येथील अंबाजी विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रेकोबा हायस्कुलच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे, मालवण केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, वायरी येथील कमी तिथे आम्ही या व्हाट्सऍप ग्रुपचे अजिंक्य पारकर, विरेश नाईक, दिपक कुडाळकर, महेश भगत, दुर्वा निर्गुण, प्रवीण कुबल तसेच बहुसंख्य पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी एसटीएस, बीडीएस व माजी प्रज्ञावान अशा २५ विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्रद्धा तळवडेकर, प्राची कुबल, शुभदा लुडबे, दुर्वा निर्गुण, विदिशा चोकेकर व शालेय शिक्षक वर्गाने आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी खोत यांनी केले.