⚡मालवण ता.१२-:
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिर ओझर कांदळगावचे माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांच्या समवेत ओझर विद्या मंदिर चे निवृत्त शिक्षक कै. श्री.केळकर सर यांच्या मालवण धुरीवाडा येथील निवासस्थानी गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला.
माजी विद्यार्थी व संघटक उमेश कोदे यांनी केळकर सर यांच्या शैक्षणिक कार्याची महती कथन करणारा गुरुवर हृद्येश्वर तू खरा हा फोटो फ्रेम मधील लेख ओझरचे पहिल्या तुकडीचे माजी विद्यार्थी श्री सुधाकर राणे कांदळगाव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मीना केळकर मॅडम यांना देण्यात आला. याप्रसंगी ओझरचे मुख्याध्यापक श्री जाधव सर ,आर पी बागवे हायस्कूल मसुरेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे मॅडम, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर शिक्षक श्री पी के राणे, श्री प्रवीण पारकर, श्री.विजय नातू, माजी शिक्षिका उषा मुरवणे मडम, विजय कांबळी, मंगल वझे, ऋतुजा केळकर आदींनी केळकर सरांच्या शिकवणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी जयसिंग जाधव सर ,नंदकुमार पाटील, लक्ष्मण परब ,सुधीर सुर्वे, मधुसूदन परुळेकर, गणेश सातार्डेकर सत्यवान परब, विराणी कोदे- सातार्डेकर आदी माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. लेखाचे अभिवाचन ऋतुजा केळकर यांनी तर प्रास्ताविक व आभार श्री प्रवीण पारकर यांनी मानले. शेवटी उपस्थित शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गुरुवंदन करण्यात आले.