Headlines

मालवणात अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची तपासणी…

⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला मालवण ग्रामीण रुग्णालयात प्रतिसाद मिळाला. यामध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिंग आणि समूपदेशन करण्यात आले. लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणे, त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे व…

Read Full News

चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम…!

⚡मालवण ता.१८-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. यावेळी विद्यार्थी विविध शेती कामांमध्ये रमले. अन्न पिकविणाऱ्या आणि आपले पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आपुलकीची, आदराची वं मित्रात्वाची भावना सर्वच मुलांमध्ये असावी, तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला….

Read Full News

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत स्कुल किटचा मोठा वाटा…

अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे.. ⚡ओरोस ता १८-: कोकण संस्थेच्या स्कुल किट या उपक्रमातून अनेक विद्यार्थी शेक्षणिक प्रवाहात येण्यास मदत होईल. दिव्यांग विदयार्थ्यांची गरज ओळखून संस्था करत असलेल्या मदतीने त्यांची वाट सुकर होईल. कोकण संस्था करत असलेले सामाजिक उपक्रम जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी बोलताना केले.कोकण कला व…

Read Full News

शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग…

संजय वेतुरेकर:सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.. ⚡कुडाळ ता.१८- : विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र वाचून प्रेरणा घ्यावी. व्यसनांपासून दूर राहून योग्य दिशा निवडून आत्मविश्वासाने वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळते, असे प्रतिपादन शिक्षक नेते संजय वेतुरेकर यांनी…

Read Full News

कुडाळ न्यायालयात जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा…

कुडाळ : दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांसोबत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते .कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क-स्तर कुडाळ जी. ए . कुलकर्णी यांचे…

Read Full News

दाभोली येथील अन्यायग्रस्त दाभोलकर कुटुंबियांच्या पाठीशी मनसे खंबीर…

कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट:महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. तसेच वेंगुर्ले तहसीलदार यांची भेट घेऊन आर्थिक आमिषाला बळी पडून नियमबाह्य मदत करणाऱ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. शिरोडकर कुटुंबीयांस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास…

Read Full News

बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेस २१ जुलैपर्यंत मुदतवाढ…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र… ⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेल मार्फत बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून नव्या परिपत्रकानुसार २१ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, त्रुटींची पूर्तता झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पसंतीक्रम आणि कॅप प्रवेश फेऱ्या सुरु होतील. यशवंतराव…

Read Full News

महिला भाजपच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे केले अभिनंदन…

⚡ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फळसेवाडी येथील सिंधुकन्या पोलीस खात्यात अप्पर पोलीस अधीक्षक ह्या पदावर काम करते हे सिंधुदुर्गातील समस्त महिला वर्गाला अभिमानाची गोष्ट आहे…

Read Full News

शिवसेनेकडून सावंतवाडीतआयोजित करण्यात आलेला नाट्य महोत्सव रद्द…

⚡सावंतवाडी ता.१५-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन झाल्यामुळे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिली आहे. विकास सावंत यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक व…

Read Full News

कट्टा महावियालयातील करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी कु. प्राची परब हिची निवड…

⚡मालवण ता.१६-:जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात करिअर कट्टाच्या करिअर संसदेचा पदग्रहण समारंभ पार पडला या करिअर संसदेच्या मुख्यमंत्री पदी कु. प्राची संभाजी परब या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा…

Read Full News

You cannot copy content of this page