कुडाळ : दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांसोबत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते .
कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क-स्तर कुडाळ जी. ए . कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम गुरुवारी १७ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी वकील सुरेंद्र मळगावकर यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन या विषयावर मार्गदर्शन केले . तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे औचित्य साधून डॉक्टर अनिकेत वजराटकर ,एम एस (सर्जन ) यांचे उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. डॉक्टर वजराटकर यांनी त्यांच्या वैद्यकीय अनुभवाच्या आधारावर मूळव्याध व बद्धकोष्ठता या सामान्य व त्रासदायक आजारापासून बचाव करण्याचे प्रभावी उपाय सुचविले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष जी ए कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश कस्तर कुडाळ यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाबाबत मार्गदर्शन केले व न्यायालयीन कर्मचारी व वकील वर्ग यांना आपापल्या तब्येतीची काळजी घेऊन न्यायालयीन कामकाजाची सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिक एच ए कारेकर यांनी केले . या कार्यक्रमात वकील आर डी बिले , वकील विवेक मांडकुलकर, सहाय्यक सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे आणि 55 ते 60 न्यायालयीन कर्मचारी व वकील उपस्थित होते.
कुडाळ न्यायालयात जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा…
