Headlines

दुर्वा नाटेकर हिचा ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या वतीने सत्कार…

⚡बांदा ता.१८-: पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील केंद्रशाळेची विद्यार्थिनी दुर्वा नाटेकर हि २७२ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या वतीने तिचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. फोटो:-बांदा येथे दुर्वा नाटेकर हिचा सत्कार करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य.

Read Full News

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षे मध्ये डिंगणे नं. १ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

⚡बांदा ता.१८-: गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षे मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले.इयत्ता दुसरीतील विद्यार्थी हर्ष ठाकर हा जिल्ह्यात द्वितीय तर रुद्र ठाकूर हा जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इयत्ता चौथीत पायल सावंत हिने तालुक्यात दुसरा क्रमांक तर रुंजी सावंत हिने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांच्या…

Read Full News

रोटरीच्या माध्यमातून समाजासाठी सर्वोत्तम कार्य…

संग्राम पाटील:रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण समारंभ उत्साहात;सिंधुरत्न बुलेटीनचे प्रकाशन.. ⚡कुडाळ ता.१८-: रोटरी इंटरनॅशनल हि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था असून रोटरीच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना उभारी देणारे सर्वोत्तम कार्य या संस्थेच्या माध्यमातून लाखो रोटरी सदस्यांनी केले आहे.विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जोपासणारी व्यक्ति या संस्थेच्या माध्यमातून योगदान देत असतात.रोटरी क्लब ऑफ कुडाळ गेली…

Read Full News

कु. आरव आईर याला ‘सुधाताई करमरकर स्मृती पुरस्कार…

नाट्य व्यवस्थपक नरेंद्र आंगणे यांनी केला आरवचा गौरव:झी च्या ‘ड्रामा ज्युनियर’ रियालिटी शो मधील यशाबद्दल पुरस्कार.. कुडाळ : येथील जि प पडतेवाडी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या आणि विविध अभिनय, नृत्य व रियालिटी शो मधून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या कु. आरव सुरेश आईर याला २०२४ चा लिटिल थियेटर बालरंगभूमीच्या संचालिका सुधाताई करमरकर स्मृती पुरस्कार देऊन…

Read Full News

रुग्णवाहिका व्यावसायिक सिरील फर्नांडिस यांचे निधन…!

⚡कणकवली ता.१८-: कणकवली शहरातील ऍम्ब्युलन्स व्यावसायिक सिरील गॅब्रीएल फर्नांडिस (वय ५८, रा. फणसवाडी, वरवडे) यांचे अल्पशा आजाराने वैद्यकीय उपचारादरम्यान गोवा – बांबुळी येथे शुक्रवार १८ जुलै रोजी पहाटे निधन झाले. सिरील फर्नांडिस हे रुग्णवाहिका व्यावसायिक म्हणून कणकवली शहरात परिचित होते. वरवडे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पदही त्यांनी भूषविले होते. गोवा – बांबुळी येथे मागील काही…

Read Full News

एकनाथ नाडकर्णी यांच्यावरील निलंबन अखेर भाजपने केले रद्द…!

⚡सावंतवाडी ता.१८-: भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस या पदावर कार्यरत असताना पक्ष शिस्तीच्या विरोधात काम करणे सुरु ठेवल्याने तत्कालीन परिस्थितीनुसार पक्षाकडून एकनाथ अनंत नाडकर्णी यांचे निलंबन करण्यात आले होते. ते पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. सद्यस्थितीत त्यांच्यावरील निलंबन रद्द करणेसाठी पक्षाकडे विनंती केलेली होती. विनंती अर्जाचा पक्षाने सहानभूतीपूर्वक विचार करून पक्षातील योगदानाची दखल घेत निलंबन रद्द…

Read Full News

विनायक राऊत उद्या सावंतवाडी मतदारसंघ दौऱ्यावर…!

⚡सावंतवाडी ता.१८-: शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री. विनायक राऊत उद्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. : शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ *सकाळी ११.३०वाजताबिळवसजलमंदिर येथे देवदर्शन दुपारी १२.३० वाजताजगन्नाथ सावंत माजी नगराध्यक्ष वेंगुर्ले यांच्या घरी सांत्वन पर भेट दुपारी १.१५ वाजतारेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊत यांच्या घरी सांत्वन पर…

Read Full News

20 जुलै रोजी मसुरे येथे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा…!

⚡मालवण ता.१८-:मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबलावादक, झांज वादक, किर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार,अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांसाठी स्थापन झालेली “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग ला शासन दरबारी मान्यता मिळाली असून संस्थेचे कार्यकारी मंडळ व या क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीसाठी व चर्चा विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा रविवार दिनांक 20 जुलै रोजी मसुरे…

Read Full News

मालवणात अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची तपासणी…

⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला मालवण ग्रामीण रुग्णालयात प्रतिसाद मिळाला. यामध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २७५ रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिंग आणि समूपदेशन करण्यात आले. लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणे, त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे व…

Read Full News

चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम…!

⚡मालवण ता.१८-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. यावेळी विद्यार्थी विविध शेती कामांमध्ये रमले. अन्न पिकविणाऱ्या आणि आपले पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आपुलकीची, आदराची वं मित्रात्वाची भावना सर्वच मुलांमध्ये असावी, तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला….

Read Full News

You cannot copy content of this page