देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची आम. निलेश राणेंकडे मागणी..

⚡मालवण ता.०७-:
कोकण विभाग सरपंच महापरीषद भरवावी अशी मागणी देवबाग ग्रामपंचायतीचे सरपंच उल्हास तांडेल यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण विभाग सरपंच महापरिषद होणे अत्यंत महत्वाचे आहे. कोकणातील पर्यटन, मच्छिमारी, आंबा, काजू व इतर बागायतदार, ग्रामविकास, आरोग्य व शिक्षण, कोकण संस्कृती या विषयावर आधारित सरपंच महापरिषद आयोजित झाली पाहिजे. त्यामुळे यासाठी पुढाकार घेऊन कोकण विभाग सरपंच महापरिषद भरवावी, अशी मागणी देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी आम. निलेश राणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
