⚡सावंतवाडी ता.१८-: भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस या पदावर कार्यरत असताना पक्ष शिस्तीच्या विरोधात काम करणे सुरु ठेवल्याने तत्कालीन परिस्थितीनुसार पक्षाकडून एकनाथ अनंत नाडकर्णी यांचे निलंबन करण्यात आले होते. ते पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. सद्यस्थितीत त्यांच्यावरील निलंबन रद्द करणेसाठी पक्षाकडे विनंती केलेली होती. विनंती अर्जाचा पक्षाने सहानभूतीपूर्वक विचार करून पक्षातील योगदानाची दखल घेत निलंबन रद्द करण्याचे ठरविले आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लेखी निवेदन देत निलंबन रद्द करून पक्ष कार्यात सक्रिय होण्यासाठी सुचवीत केले आहे.
यापुढे भारतीय जनता पार्टीचे काम जोमाने करून पक्षवाढीसाठी योगदान द्याल या अपेक्षेसह शुभेच्छा देखील दिल्या आहेत
