दुर्वा नाटेकर हिचा ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या वतीने सत्कार…

⚡बांदा ता.१८-: पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील केंद्रशाळेची विद्यार्थिनी दुर्वा नाटेकर हि २७२ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या वतीने तिचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पालक दत्ताराम नाटेकर यांच्यासह संघाचे अध्यक्ष अन्वर खान, खजिनदार जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, सुभाष नाईक, अच्युत पिळणकर, महादेव वसकर, नागेश सावंत, सचिव गुरुनाथ नार्वेकर, सतीश नाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी दुर्वा हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

फोटो:-
बांदा येथे दुर्वा नाटेकर हिचा सत्कार करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य.

You cannot copy content of this page