Headlines

उबाठा शिवसेनेतर्फे मालवणात बंधारे उभारणी संकल्पाचा शुभारंभ

आडवण येथे घातला वनराई बंधारा

मालवण (प्रतिनिधी)

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी उबाठा शिवसेनेतर्फे शंभर वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केल्यावर याचा शुभारंभ मालवण शहरातील आडवण येथील जलस्रोतावर मातीचा बंधारा बांधून करण्यात आला.

उबाठा शिवसेनेतर्फे मालवण आडवण भागातील जलस्रोतावर जेसीबीच्या साहाय्याने मातीचा बंधारा घालण्यात आला. यामुळे तेथील पाणी अडून राहण्यास मदत होणार आहे. यावेळी नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, उबाठा शिवसेनेच्या महिला उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, मालवण शहरप्रमुख राधिका मोंडकर, मनोज मोंडकर, गणेश चव्हाण, दत्ता पोईपकर, स्थानिक नागरिक उत्तम चव्हाण, शशिकांत यादव, सुरेश चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी पूजा करलकर म्हणाल्या, शासनाने दुष्काळ जाहीर केला असून संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी शंभर वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. याचा शुभारंभ आज आडवण येथे करण्यात आला आहे. मालवण नगरपालिका सध्या आपल्या कामात व्यस्त असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आम्ही हा बंधारा घातला आहे. यासाठी उबाठा शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांचे सहाय्य लाभले आहे, असेही सौ. करलकर म्हणाल्या.

You cannot copy content of this page