Headlines

राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत मालवणचा सिद्धेश चव्हाण प्रथम

मालवण (प्रतिनिधी)

आंबेगाव पुणे येथील शिवसृष्टी थीम पार्क तर्फे शिवसृष्टी व शिवचरित्र यावर आधारित आयोजित राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत मालवण येथील सिद्धेश अर्जुन चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शिवसृष्टी थीम पार्क तर्फे लाखोंची बक्षिसे असलेल्या सर्वात मोठ्या अशा राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील रीलस्टार व सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाण याने ‘शिवसृष्टी थ्रू माय लेन्स’ या स्पर्धेतील संकल्पनेद्वारे आंबेगाव येथील शिवसृष्टी व शिवकाळातील प्रसंग आपल्या रीलद्वारे मांडले होते. सिद्धेश याचे हे रील स्पर्धेत अव्वल ठरून त्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. पुणे आंबेगाव येथे शिवसृष्टी थीम पार्क मध्ये आयोजित बक्षीस वितरण समारंभात राजस्थानचे राज्यपाल श्री. हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक विजेत्या सिद्धेश चव्हाण याला १ लाख ४० हजार रुपयाचे भेटवस्तू रुपी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सिद्धेश याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page