⚡सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकुण ४ जागा आरक्षित झाल्या असून त्यातील २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही. तर इतर मागास प्रवर्गासाठी १७ जागा आरक्षित असून त्यातील ८ महिला तर ९ जागा सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. तसेच सर्वसाधारण आरक्षणामध्ये ४२ जागा असून त्यात २१ महिला व २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यात.
सावंतवाडीत ६३ ग्रा.पं.च सरपंच आरक्षण जाहीर
ना.मा. प्र. खुला प्रवर्ग – ९
: माजगाव, मळगाव, सातार्डा, दांडेली, धाकोरे, असनिये, केसरी – फणसवडे, रोणापाल, पडवे माजगाव
ना. मा. प्र. महिला : ८
चौकुळ, न्हावेली, कास, निगुडे, आंबेगाव, कवठणी, वेत्ये, सरमळे
सर्वसाधारण प्र. महिला : २१
कोलगांव, इन्सुली, आंबोली, मळेवाड,सांगेली, ओटवणे, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विलवडे, देवसू – दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदुवे, पारपोली, किनळे, आरोस, गेळे
सर्वसाधारण खुला प्रवर्ग : २१
बांदा, तळवडे, आरोंदा, कारीवडे,माडखोल, नेमळे, चराठे, निरवडे, आजगाव, शेर्ले, ताबोंळी, वेर्ले, सातूळी – बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे, नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फ सातार्डा, कोनशी – दाभिळ, नाणोस
अनुसूचित जाती महिला : २ सोनुर्ली, कलंबिस्त
अनुसुचित जाती खुला प्र. : २
कुणकेरी, तिरोडा
